
अमळनेर:- तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तुषार पाटील यांची निवड करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माचला येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण आबाजी पाटील उपस्थित होते.
यावेळी आर बी पाटील, सुनील पाटील,मेघश्याम सोनवणे, आसाराम सैंदाणे,एम ए पाटील, पी बी पाटील, प्रमोदिनी पाटील, मनोज पाटील,बापू चव्हाण आदी उपस्थित होते. तुषार पाटील यांच्या निवडीबद्दल आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे,एस डी भिरूड ,जे के पाटील, संदीप घोरपडे, संभाजीराव पाटील,शैलेश राणे, संजय पाटील,आर जे पाटील, सुशिल भदाणे,ईश्वर महाजन, साखरलाल माळी यांनी अभिनंदन केले आहे.




