
अमळनेर:- स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात अमळनेर नगरपरिषदेचा नाशिक विभागात पहिला क्रमांक आला आहे. तर राज्यात ४६ वा आणि देशाच्या पश्चिम विभागात ९ वा क्रमांक आला आहे.
५० हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांमधून संपूर्ण देशातून १०४ क्रमांकाची रँक मिळाली आहे. देशाच्या पश्चिम विभागात गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र या पाच राज्यातील १३० नगरपलिकांमधून ९ वा क्रमांक मिळवला आहे. अमळनेर नगरपालिकेला ९५०० पैकी ६८९६.८५ गुण मिळाले आहेत. हगणदारी मुक्त मध्ये मानांकन ‛ओडिएफ ++’ मिळाले आहे. तर कचरामुक्त मध्ये ‛१ स्टार’ मानांकन मिळाले आहे. अमळनेर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच स्पर्धेत क्रमांक मिळवण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, हैबत पाटील, समन्वयक गणेश गढरी यांनी प्रयत्न केले.

