
रस्ते अपघात,सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर केले सविस्तर मार्गदर्शन…
अमळनेर:- अमळनेर बस आगारात रस्ते अपघात सुरक्षा सुरक्षितता अभियानाचे उदघाटन प्रांताधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर(गुरुवारी) करण्यात आले.यावेळी रस्ते अपघात,सुरक्षा व सुरक्षितता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे,रा.प.महामंडळाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक माधवराव देवधर,आगार प्रमुख इम्रान पठाण,सहाय्यक वाहतूक अधीक्षक सी.एस. चौधरी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर उपस्थित होते.
यावेळी चालक, वाहक,तसेच यांत्रिक व प्रशासन विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुषार पाटील,सतीश सातपुते, भारती धनगर, व्ही. आर. चौधरी,एस.आर. भारंबे यांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन सोनाली धनगर यांनी केले.




