
अमळनेर:- जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त स्पार्क फाउंडेशन तर्फे दिनांक १२ रोजी तालुक्यातील नंदगाव येथे दुर्मिळ शिवकालीन शस्रांचे प्रदर्शन आणि शिवकालीन लाठी काठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन प पू श्री श्री १००८ ईश्वरदासजी महाराज, श्री गोविंदासजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले. स्पार्क फाउंडेशनचे पंकज दुसाने यांचे शस्र प्रदर्शन तर विदर्भ प्रमुख हितेश डफ (नागपूर) हे मोफत लाठी काठी प्रशिक्षण देणार आहेत.तरी तरुणांनी या प्रदर्शनाचा व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

