
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील योगेश नारायण शिसोदे यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नुकतेच याबाबतचे नियुक्तीपत्र माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्याहस्ते योगेश शिसोदे यांना देण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी नगरसेवक शाम पाटील, सचिन वाघ यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.




