
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते हर्षल भिकनराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

रवींद्र भैय्यासाहेब पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र हर्षल पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, माजी नगरसेवक शाम पाटील, भिकनराव पाटील, सचिन वाघ, रवींद्र साळुंखे, अतुल साळुंखे, योगेश शिसोदे, योगेश पाटील, श्रीकांत साळुंखे, अक्षय साळुंखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.




