
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ गावालगत असलेल्या पांझरा नदीपात्रातून वाहनांद्वारे अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता छगन कोळी व बापू शिरसाठ हे मांडळ ते सोनगीर दरम्यान ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. भरत गायकवाड करत आहेत.




