
शहरातील गरजू व्यक्तींना उबदार चादरी केल्या वितरित…
अमळनेर:- येथील अमळनेर लीनेस क्लबच्या प्रेसिडेंटपदी नम्रता अजय हिंदुजा यांची निवड करण्यात आली असून माजी प्रेसिडेंट राजुल दिलीप गांधी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

२० जानेवारी रोजी सुजान मंगल कार्यालयात क्लबचा पद्ग्रहन सोहळा इन्स्टॉलेशन इन्स्टॉलिंग अधिकारी तसेच ऑल इंडिया ली क्लब फाउंडर मंजिरी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी प्रेसिडेंट पदी नम्रता हिंदुजा, सेक्रेटरी पदी भगवती मकवान तर ट्रेझरर पदी रुपाली जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी जास्मिन भरुचा व कांचन शहा यांनी आशीर्वचन दिले.सूत्रसंचालन डॉ.मंजुश्री जैन यांनी केले.यावेळी परमिंदर कालरा यांच्याकडून शहरातील गरीब व्यक्तींना उबदार चादरी वितरित करण्यात आल्या.




