
खाटीक समाज बांधवांचा हिंदू बांधवानी केला सत्कार…
अमळनेर:- श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी अमळनेर शहरातील सर्व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अमळनेर येथील खाटीक समाज पंच कमिटी व अमळनेर चिकन मटण विक्रेता संघटना यांनी घेतला आहे.

सदर स्तुत्य निर्णयाबद्दल हिंदू बांधवांच्या वतीने दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी निलेश भाडांरकर, सुनिल भामरे, सुरज परदेशी,संजय चौधरी उपस्थित होते.यावेळी खाटीक समाज पंच कमिटीचे अध्यक्ष मुक्तार खाटीक,उपाध्यक्ष जाकीर अब्दुला,इम्रान खाटीक,अब्बास खाटीक,आरिफ खाटीक, नूरजमाल खाटीक,आसिफ खाटीक, आरिफ खाटीक,अनिस खाटीक,जाकीर खाटीक,रजाक खाटीक तसेच अमळनेर चिकन मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इम्रान हरून खाटीक,उपाध्यक्ष अर्शद खाटीक,शाहरुख खाटीक, शकील खाटीक,इम्रान खाटीक, दानिश खाटीक, रिजवन खाटीक, मुजफ्फर खाटीक,अजहर खाटीक, अकबर खाटीक,वाहिद खाटीक तसेच सर्व विक्रेते उपस्थित होते.




