
अमळनेर:- शहरातील रामवाडी येथे सुरू असलेल्या दुर्गा फाऊंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काल दिनांक २१ रोजी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील व सोनी दीदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंदाकिनी भामरे, आशा चावरिया, अविनाश पाटील सुनीता वानखेडे हे उपस्थीत होते. सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन उत्कर्ष पवार व सचिव अलका पवार तसेच शाळेच्या प्राचार्या वर्षा सोहिते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमात विविध प्रकारचे नृत्य व नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या. विशेष म्हणजे कडाक्याची थंडी असुनही पालक व प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत जागेवर खिळून बसले होते. एका पेक्षा एक सरस नृत्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर करत प्रेक्षक वर्गांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती चव्हाण व मनीषा सोनार यांनी केले. नृत्य दिग्दर्शन योगिता पाटील, पल्लवी येवले, मनीषा शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत पाटील, पवन पाटील, योगिता फाळके, सुवर्णा पाटील, संगीता पाटील, भारती गव्हाणे यांनी परिश्रम घेतले. त्यांना संस्थेच्या सचिव अलका पवार व प्राचार्या वर्षा सोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.




