
अमळनेर:- सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी स्वतः पदर मोड करून तयार केलेल्या अहिराणीतील मतदार जागृती गीताची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत एरंडोल येथे कौतुक करून अभिनंदन केले.
आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शासनाने मतदार यादी पुनर्परिक्षण, नवे मतदार समाविष्ट करण्याचा उपक्रम सुरू केला होता. या वेळी निवृत्त तहसीलदार महाजन यांनी हे गीत अहिराणी भाषेतून गायीले आहे. या गीताला संगीत व ध्वनी मुद्रण दोंडाईचा येथील एकनाथ मराठे यांचे आहे. सुदाम महाजन यांच्या समवेत सुनीता माळी यांचे संवाद आहेत. या गीतातून पती पत्नीला सांगतो की काय डोळे लावून बसले आपली मुलगी अठरा वर्षांची झाली. त्यावेळी पत्नीला मुलीचे लग्न करावे लागेल अशी चिंता वाटते. त्यावर पती तिच्यावर रागावतो आणि म्हणतो की नाही तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी तिचे नाव मतदार यादीत टाकावे लागेल. तिला देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी तिला मतदार करून नेता निवडण्याचा अधिकार द्यावा लागेल मग तिचे लग्न करावे लागेल. आपला मुलगा व मुलगी अठरा वर्षाची झाली की त्यांचे नाव मतदार यादीत टाका, असे आवाहन अहिराणी भाषेतून करण्यात आले आहे. अत्यंत समर्पक संवाद फेक आणि गाण्यातील मनमोहक बोलमुळे या गीताने मतदार जनजागृतीसाठी मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे हे गीत अमळनेर आणि एरंडोल नगर पालिकेची घंटागाडीवर वाजवले जात आहे. यातून जनजागृती होण्यास मोठी मदत मिळत आहे. त्यामुळे एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांच्या गीताचे भरभरून कौतुक करीत अभिनंद केले.




