
जनजागृती कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप…
अमळनेर:- दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत राष्ट्रीय मतदार जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
अमळनेर प्रांत कार्यालय तसेच तहसील कार्यालय अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालय ,धनदाई महाविद्यालय, महिला महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धेत प्राविण्य मिळवले. दिनांक 25 जानेवारी रोजी प्रताप महाविद्यालयात प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला देखील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थी यांनी उपस्थिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या विशेष प्राविण्याबद्दल त्यांना बक्षीस प्रमाणपत्र देण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या आणि प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती विषयी संदेश दिला. सदर कार्यक्रमा दरम्यान समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळी काढली होती याशिवाय निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, लघु नाट्य, पोस्टर्स या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर कार्यक्रमाला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे,प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा, नायब तहसीलदार ढोले, निवडणूक शाखा अधिकारी नितीन ढोकणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ जैन, प्राचार्य डॉ शेख, धनदाई महाविद्यालयाचे प्रा. लीलाधर पाटील तसेच प्राचार्य डॉ पी एस पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ अस्मिता सरवैया, प्रा.हेमंत पवार प्रा सुनील वाघमारे प्रा. डॉ लीलाधर पाटील डॉ श्वेता वैद्य, डॉ. अनिता खेडकर, डॉ भरत खंडागळे, डॉ जगदीश सोनवणे, प्रा. डी आर ढगे, डॉ एस आर चव्हाण, अभियान समनायक प्रा. विजयकुमार वाघमारे , कार्यालयीन अधीक्षक अनिल वाणी यांचे अनमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बाबत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत पवार, प्रा डॉ भरत खंडागळे यांनी तर आभार डॉ. श्वेता वैद्य यांनी मानले.




