
प्रजासत्ताक दिनानिमित्त ४०० विद्यार्थ्यांना दुध वाटपाचा कार्यक्रम…
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील जि. प. प्राथमिक शाळा व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ४०० विद्यार्थ्यांना दुध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
चिमनपुरी पिंपळे जि. प. प्राथमिक शाळा व कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम बारकू भगवान भिल व अशोक राजाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खु येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी आर पाटील व ग्रामपंचायत पिंपळे बुद्रुक दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पिंपळे येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी. आर.पाटील यांच्या कडून विद्यार्थ्यांना दुध वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी, आजी माजी सैनिक, आर्डी येथील पोलीस पाटील किरण वानखेडे, संगणक ऑपरेटर महेश कापडे व पंकज पाटील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून तंबाखूमुक्त शपथ घेण्यात आले त्याप्रसंगी जि. प. प्राथमिक शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व नवोदयात जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये 1 नंबर आलेली रोशनी ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थिनीला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजू पाटील, उपशिक्षक सुनील दौलत वाघ, इसाक मावची, पदवीधर शिक्षिका मीना अभिमान सोनवणे, वंदना पाटील, दर्शना पाटील, वैशाली देवरे, भारती पाटील, कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक अशोक देसले, ज्येष्ठ शिक्षक जगदीश पाटील, चंद्रकांत पाटील, मधुकर निकम, गोपाल पाटील, राहुल पाटील, श्रीमती शिरसाठ, शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक मोरे,अंकुश पाटील, केंद्र प्रमुख रवींद्र पाटील, सरपंच वर्षा युवराज पाटील, माजी सरपंच योगेश पाटील, उपसरपंच शोभाबाई पाटील, सदस्य अरुण पाटील, संतोष चौधरी, कल्पना पाटील, मिनाबाई पाटील, जयश्री पाटील व महिला बचत गटाचे अध्यक्ष स्वाती पाटील व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक किरण लंकेश, शिपाई ज्ञानेश्वर पाटील, रोजगार सेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, सर्व ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




