
गावात दारूबंदी करण्याबाबत मारवड पोलिसांना दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथे प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत ग्रामस्थांनी व महिलांनी पुढाकार दारूबंदीचा ठराव केला आहे.
तालुक्यातील सबगव्हाण येथे प्रजासत्ताक दिनी दारू विक्री बंदी करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी शंभर टक्के दारूबंदीचा बहुमताने परित केला. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यानंतर उपस्थित महिला व ग्रामस्थांनी मारवड पोलीस ठाणे गाठत एपीआय शितलकुमार नाईक यांना निवेदन दिले. तसेच गावात दारूबंदी करून विक्री थांबवण्यात यावी, अशी मागणी केली.




