
अमळनेर:- तालुक्यातील अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत तब्बल ५८ वर्षानंतर ग्रामपंचायतीच्या इमारतीवर तिरंगा फडकला. पहिल्यांदाच सरपंच सुनील मंसाराम पाटील यांनी ध्वजारोहण केले.
१९६५ पासून अंबारे खापरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापन झाली. मात्र ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करण्याचा स्तंभ नव्हता. सरपंचांना जिल्हा परिषद शाळेत जाऊन ध्वजारोहण करावे लागत होते. अखेरीस सरपंच सुनील पाटील व ग्रामसेवक सुनीलकुमार पाटील यांनी ध्वज स्तंभ उभारला आणि २६ जानेवारी २०२४ रोजी प्रथमच ग्रामपंचायत इमारतीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक जे के पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ हजर होते.

