
अमळनेर:- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे अमळनेर शहरातील मयुर बाळकृष्ण बागुल यांचे सर्जक लेख संग्रह पुस्तकाचे प्रकाशन मा. अमर हबीब, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, जेष्ठ विचारवंत, लेखक, साहित्यिक, मा. संदीप वाकचौरे, शिक्षण तज्ज्ञ, लेखक, जे. डी. पराडकर, लेखक व पत्रकार घनश्याम पाटील, प्रकाशक – चपराक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत लिखाण सर्जक पुस्तकात अधोरेखित केले आहे. समाजातील प्रश्न हे अस्वस्थ करतात आणि त्याबाबत सोखल मंथन करुन पुढे लिहितात हे आशादायक आहे. सर्जक लेख संग्रह हा अमळनेर येथे साने गुरुजींच्या कर्मभूमी मध्ये प्रकाशित होणे हे मयुर बागुल यांचे भाग्य आहे. सर्जक पुस्तक हे विविध अंगांनी समाजामधील प्रश्न आणि त्याबाबत चिंतनपर लेखन हे आजच्या पिढीतील युवक लिहीत आहे हे होणे आजची गरज आहे. पुस्तकातील लेखक सर्वांगाने विचार करून त्याबाबत चिंतन करणारे आहे असे मत मा. संदीप वाकचौरे यांनी मांडले. सर्जक हे पुस्तक विविध सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यावर सतत लिखाण करणे हे आजचा युवक असे विचार आजचा युवक समाजासमोर मांडतो हे खुप महत्त्वाचे आहे. मा. जे. डी. पराडकर यांनी व्यक्त केले. सर्जक पुस्तक हे मयुरने लिखाण केले यामुळे मला आंनद आहे. आज वर ३२ वर्ष साप्ताहिक उदयकाळ वृत्तपत्र चालवले. आज माझा मुलगा पुणे सारख्या शहरात जाऊन विविध वृत्तपत्रात लिहीत आहे. आज चपराक प्रकाशन संस्थेचे घनश्याम पाटील यांनी हे पुस्तक प्रकाशित करणे हे आमच्या साठी अभिमानाची बाब आहे असे सांगत चपराक प्रकाशन परिवाराचे आभार बाळकृष्ण बागुल यांनी मानले. पुस्तक प्रकाशनासाठी मयुर बागुल यांचे आई व वडील, सासू व सासरे व कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र परिवार उपस्थित होते. सर्जक हे पुस्तक चपराक प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले त्याबद्दल त्यांचे आभार मयुर बागुल यांनी मांडले.




