
दरवेशी ह्या एकांकिकेने प्रेक्षकांना गांभीर्याने विचार करण्यास केले प्रवृत्त…
अमळनेर:- अहिराणी संस्कृती अभ्यासक पत्रमहर्षी सदाशिव माळी स्मृति समर्पित परिसंवाद बोलीभाषा अभिव्यक्ती सौंदर्य आणि विद्रोह या विषयावर आयोजित करण्यात आलेला होता.
या परिसंवादात अहिराणी भाषेचे अभ्यासक वाल्मीक आहिरे, डॉ.एस.के.पाटील, आदिवासी बोली भाषेचे अभ्यासक सुनील गायकवाड यांनी लेवा गणपोली भाषेचे अभ्यासक किसन बोराडे व बोली भाषेच्या अभ्यासक डॉ.रामकिसन दहिफळे यांनी बोलीभाषेत असणारे साहित्य देखील कसदार असते, अशी भूमिका मांडत प्रमाणभाषा ही बोलीभाषामुळे समृद्ध होते हे समजून घ्यावे असे आव्हान केले. याप्रसंगी बोलताना या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी अहिराणी भाषेतला गोडवा उलगडून दाखवत भाषा हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम कसे असते हे दाखवून दिले या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. जगदीश ओहोळ यांनी केले तर आभार प्रमोद चौधरी यांनी मांडले.
दरवेशी एकांकिकेने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध…

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्यमंचावर दरवेशी ही एकांकिका प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करून गेली. दिवंगत लेखक जयंत पवार लिखित, विजय मुंडकर दिग्दर्शित व अभिषेक मोरे यांचे पार्श्व संगीत असलेली दरवेशी एकांकिका वसंत अंजर्लेकर सुरेंद्र नाईक यां कलाकारांनी विद्रोहीच्या मंचावर सादर केली. या एकांकिकेला उपस्थित रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.




