
राज्यस्तरीय स्पर्धेत पवनने पटकावले रौप्य पदक…
अमळनेर:- महाराष्ट्र ज्यूडो असोसिएशन नागपूर व पुनीत बालन ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सुवर्ण महोत्सव ज्यूडो स्पर्धेत अमळनेर येथील जयहिंद व्यायामशाळेच्या पवन शिंपी याने रौप्य पदक मिळवले आहे.
१ ते ५ फेब्रुवारी दरम्यान मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत ११५० खेळाडू ६४ गटात सहभागी झाले होते. पवन शिंपी याने रौप्य पदक मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल माजी नगरसेवक प्रताप शिंपी, संजय पाटील, पैलवान बाळू पाटील, सुनील वाघ, जीवन पवार यांनी अभिनंदन केले आहे.




