
अमळनेर:- येथील अखिल भारतीय 97 व्या मराठी साहित्य संमेलनात जि. प. च्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने स्टॉल लावून “बेटी बचाओ बेटी पढाओ” तसेच लेक लाडली योजनेबद्दल जनजागृती करण्यात आली.
अमळनेर येथील महिला बालकल्याण विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रेमलता पाटील तसेच महिला बाल संरक्षण अधिकारी योगिता चौधरी,पर्यवेक्षिका ज्योत्स्ना चौधरी,अलका पाटील, श्रीमती पगारे तसेच अंगणवाडी सेविका संगीता पाटील,शितल पाटील,उर्मिला पाटील,सीमा पाटील,अश्विनी पाटील यांनी दिवसभर स्टॉल वर थांबून याबाबत जनजागृती केली.स्टॉल वर मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, बालिका जन्मोत्सव साजरा करूया,मुलीच्या शिक्षणास प्रोत्साहन देऊन या, बालविवाह थांबवूया,मूला मुलींसाठी समान संपत्ती हक्काना प्रोत्साहन देऊन या असा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. तसेच याच संदेशाचे पत्रक देखील वाटून जनजागृती करण्यात आली.सदर स्टॉलला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, महिला बालकल्याण मुंबई चे श्री नागरगोजे,प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा, भुसावळचे महिला बालकल्याण अधिकारी ऍड विजयसिंह परदेशी यासह असंख्य साहित्यिक, महिला भगिनी व इतर मान्यवरांनी भेट दिली.




