
अमळनेर:- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथे २ फेब्रुवारी रोजी ऊदवेली प्रकाशनाचे, डॉ.गौरी जोशी लिखित “दोन कटिंग: लेटस् टॉक कृष्णा” हे पुस्तक संमेलनाध्यक्ष डॉ.राजेंद्र शोभणे यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
प्रकाशन सोहळ्यास संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, साहित्यिक रमेश वंसकर, गजानन देसाई, वैदेही नाखरे आणि अन्य साहित्यिक उपस्थित होते. ट्रंककॉल टू कृष्णा हे डॉ. गौरी जोशी यांचे हे पहिले पुस्तक असून दोन्हीं पुस्तके स्ट्रेस मॅनेजमेंट विषयी असूनसुद्धा दोन्हीं पुस्तकातील भूमिका मात्र वेगळी आहे.




