
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात दत्तक ग्राम गोवर्धन येथे काल शिबिराच्या चौथ्या दिवशी श्रमदान करण्यासाठी रॅली काढली.
श्रमदानापूर्वी रॅलीने “सक्षम युवा समर्थ भारत” असा जयघोष केला. आणि गावाच्या चौकात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ‘नशा करे दुर्दशा’ या पथनाट्याचे सादरीकरण करून गावात जनजागृती केली. या पथनाट्यामध्ये कु.नाजमीन पठाण, पूनम भील, अजय भील, गणेश मोरे,आकाश पाटोळे, निलेश गायकवाड आदींनी सहभागी होत पथनाट्य सादर केले.




