
दहिवद आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे केले वाटप…
अमळनेर:-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी प्रमुख अतिथी होते.
तालुक्यातील दहिवद येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. यावेळी जितेंद्र पाटील,कुणाल इंगळे, स्वप्नील पाटील,रोशन सोनवणे,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आश्रमशाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




