
अमळनेर:- येथील साने गुरुजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
सानेगुरुजी शाळेचे शिक्षक डी के पाटील व डी ए धनगर यांनी विद्यार्थ्यांसह अग्निशमन विभागात येऊन अग्निशमन विभाग कसे कार्य करते ? अग्निशमन व्यवस्था कशी पुरविते ? याबद्दल माहिती घेतली. तथा स्वतः त्यांनी अग्निशमन वाहन चालक, फायरमन व अग्निशमन प्रमुख यांचे माध्यमातून तात्पुरते प्रशिक्षण घेतले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशाने अग्निशमन प्रमुख नितीन खैरनार यांनी संबंधित विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक दिले. अग्निशामक दल प्रत्यक्ष कसे काम करते ? कर्मचार्यांना धोका किती ? सुरक्षा कशी करावी ? याबाबत माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.




