
अमळनेर:-येथील प्रताप महाविद्यालयाचे किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक प्रा.डॉ. भरतसिंग पाटील यांना राज्य शासनामार्फत रा.भा. पाटणकर पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 50 हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 नुकतेच जाहीर झाले असून याबाबत चा शासन निर्णय दि 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध झाला आहे.यात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे प्रा डॉ. भरतसिंग पाटील यांना प्रथम प्रकाशन समिक्षा सौंदयशास्त्र या प्रकारात रा.भा.पाटणकर पुरस्कार पाण्यारण्य तृष्णेची शोधयात्रा या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे.50 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून वर्णमुद्रा पब्लिशर्स शेगाव यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
प्रा. डॉ. पाटील यांना शासनाचा हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल सर्व संचालक मंडळ व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी जैन व प्राध्यापक वृंदानी अभिनंदन केले आहे.




