
अमळनेर:- येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांना त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक सेवा व ३२ वर्षांची निष्कलंक पत्रकारितेबद्दल लंडन येथील ख्यातनाम केंब्रीज डिजिटल विद्यापीठाने पी.एच.डी. (डॉक्टरेट) पदवी देऊन सन्मानीत केले.
हरियाणा राज्यातील सुरजकुंड येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक महनीय व वंदनीय मान्यवरांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान समारोह झाला. भारत व नेपाळ मधील मोजक्याच मान्यवरांना हा बहुमान मिळाला आहे. महाले यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.




