
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील १९ वर्षीय तरुण घरात कोणालाही न सांगता निघून गेला असून याप्रकरणी मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील सीताराम बापू वडर ( वय १९) हा दिनांक ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीच न सांगता निघून गेला. आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली असता आजतागायत त्याचा तपास न लागल्याने त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना भरत गायकवाड हे करीत आहेत.




