
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथे ४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
तालुक्यातील अमळगाव येथील जयप्रकाश नगर भागात राहणारा भिकण भगवान थोरात (वय ४०) हा आपली आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना दिनांक ११ रोजी मध्यरात्री ते दिनांक १२ च्या पहाटे दरम्यान त्याने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दिनांक १२ रोजी सकाळी ते उघडकीस आल्याने त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




