
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचा दि. १२ फेब्रुवारी रोजी समारोप करण्यात आला.
गोवर्धन येथे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेश कुमार सुराणा हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास पाटील हे होते. यावेळी सर्व संचालक मंडळ तसेच माननीय शांताराम शामराव पाटील, डॉ.प्रशांत शिंदे, लोकनियुक्त सरपंच पंकज युवराज निकम, अनिल निंबा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण या विद्यार्थिनीने केले, तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.दिलीप कदम यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने विद्यार्थ्यांनी केली. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा योग्य वापर करावा, आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, स्पर्धेचे युग आहे. तरी अभ्यासात अधिक लक्ष घालावे, असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. त्यानंतर आकाश पाटोळे ,पूनम भिल, कल्याणी पाटील, निकिता वाघ, संजय सोनवणे, शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कोमल पाटील या विद्यार्थिनींनी मानले. सदर शिबिरास सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

