मुख्याधिकारी सरोदे यांच्या निरोप समारंभाप्रसंगी गौरवोद्गार…
अमळनेर:- अधिकारी ते सामान्य नगरपालिका कर्मचारी यात कुठलाही भेदभाव न ठेवता प्रशांत सरोदे यांनी आपला कार्यभार सांभाळला. त्यामुळेच सर्वांना सोबत घेऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख अमळनेरकरांना झाली, असे मत माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील यांनी अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील हे होते. यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डॉ. अनिल शिंदे,प्रा. अशोक पवार, मनोज पाटील, बबली पाठक, नरेंद्र संदानशिव योगराज संदानशिव,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, अनिल महाजन, पंकज चौधरी, प्रशांत निकम, सोमचंद संदानशिव आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रशांत सरोदे यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रा. अशोक पवार म्हणाले की,प्रशांत सरोदे यांनी अमळनेर येथे शहर सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले. आणि राज्यात विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. शहरात अतिक्रमण असेल किंवा नवीन दुकानें असतील त्याबाबतीत त्यांनी योग्य निर्णय घेतला. नगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना न्याय दिला. माजी नगरसेवक मनोज पाटील म्हणाले की,प्रशासक काळात प्रशांत सरोदे यांनी माजी नगरसेवक यांना आदरयुक्त सन्मान दिला. अभ्यासू व्यक्तिमत्व, लोकप्रतिनिधी बरोबर अभ्यासू अधिकारी सोबत असणे महत्वाचे असते. अमळनेर शहरात स्वच्छ व सुंदर शहर याची ओळख करण्यासाठी मंत्री अनिल पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. प्रशासक व मुख्याधिकारी ही दोघी भूमिका योग्य पार पाडली.माजी नगरसेवक बबली पाठक म्हणाले की,प्रशांत सरोदे यांचे कर्मचारी म्हणजे सरोदे बिग्रेड असा प्रभाव अमळनेर शहरात दिसत होता.
यावेळी डॉ. अनिल शिंदे, अनिल पेंढवाल, सोमचंद संदानशिव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत सरोदे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, ज्या भूमीत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाले त्याच भूमीत अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच, शहरात ज्या मुख्य समस्या होत्या त्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. नगरपालिकेत समस्या खुप मोठ्या असतात, मात्र निधी पुरेसा असणे महत्वाचे असते.माझ्या या कार्यकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्वच्छता कामगार असतील या सर्वांनी कामाला प्राधान्य दिले म्हणून अमळनेर शहरात उत्कृष्ट कामे झाली. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यावसायिक,नगरपालिका कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, प्रास्ताविक उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केले.