
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात क.ब.चौ. उ.म.वि.च्या विद्यार्थी विकास विभागामार्फत व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि युती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाच दिवसीय ‘ ‘मिशन साहसी’ अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी स्त्रियांचे आरोग्य व योगा यावर योग शिक्षिका प्रा.अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन पार पडले. तर दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या देवरे यांनी स्त्रियांचे आरोग्य व समस्या यावर मार्गदर्शन केले. दि.15 फेब्रुवारी रोजी मा.भारती गाला (संचालिका कलाश्री क्राफ्ट) यांचे गृह उद्योग व महिला या विषयावर तर दि.16 फेब्रुवारी रोजी ऍड. शशिकांत पाटील (अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील) यांचे महिलांचे कायदे व हक्क आणि दि. 17 फेब्रुवारी रोजी प्रा. डॉ. अर्चना पाटील यांचे स्वयंरोजगार व बचत गटाची भूमिका यावर व्याख्यान आयोजित केले आहे. सदर कार्यशाळेचा समारोप दि.17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. संजय पाटील (जिल्हा समन्वयक विद्यार्थी विकास विभाग क.ब.चौ. उ.म.वि. जळगाव), प्रा. डॉ. संदिप नेरकर सिनेट सदस्य तसेच प्राचार्य डॉ.वसंत देसले यांचे उपस्थितीत आयोजित केलेला आहे, असे महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.जितेंद्र माळी यांनी कळविले आहे.
सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.





