अमळनेर:- येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली ग्रुपला ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ न्यू ग्रुपचा बहुमान मिळाला असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
धुळे येथील हॉटेल चंद्रदीप रेसिडेन्सी येथे फेडरेशन 2 च्या नुतन अध्यक्षा,श्रीमती चंद्रकला जगताप व कौन्सिल मेंबरचा शपथविधी झाला.या ठिकाणी जायन्ट्स फेडरेशन-2 मधील 2023 च्या मावळत्या अध्यक्ष ऍड.संगीताताई पाटील शहादा यांच्याकडून कामाची दखल घेऊन हे मोमेंटो व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयकुमार चौधरी होते, तसेच जायन्ट्सचे सेंट्रल कमिटी मेंबर रवींद्र जमादारजी यांची व स्पेशल कमेटी मेंबर, किशोर कुमार मिश्रा, गोविंदभाई पटेल ,बाबुरावजी बगाडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, मा.महापौर प्रतिभा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी अमळनेर जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली अध्यक्षा दिपीका सोनवणे यांना ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ न्यू ग्रुपने सन्मानित करण्यात आले.तसेच सुदर्शना राजमल पाटील यांना बेस्ट काँट्रीब्यूशन प्रोजेक्ट याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रूपच्या उपाध्यक्ष रूपाली पवार, सचिव शोभा पाटील,कोषाध्यक्ष सुनंदा पाटील, सदस्या शालू बोरसे, कमल पाटील व विजया पाटील उपस्थित होत्या.