
अमळनेर-महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद,महाराष्ट्र राज्य तर्फे व भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच धुळे येथे पार पडून या सोहळ्यात श्री कृष्ण ऍग्रो चे संचालक व फाफोरे बु ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र दिनकरराव पाटील यांना राज्यस्तरीय कृषीरत्न नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या कृषी विषयक,शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून म्हणून हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.सदर पुरस्कार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील,माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,धुळे जि प च्या अध्यक्ष सौ धरतीताई देवरे,पदवीधर आमदार सत्यजित तांबे,माजी मंत्री आमदार जयकुमार रावल व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.सदर पुरस्काराबद्दल जितेंद्र पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





