
अमळनेर:- येथील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुलच्या इयत्ता ७ वीची डॅफोडील जगदीश सोनवणे या विद्यार्थीनीची इंस्पायर अवॉर्ड साठी निवड करण्यात आली आहे.

सदर निवड हि गव्हरमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या मार्फत करण्यात आलेली असुन,सदर निवड नाविन्यपुर्ण कल्पना आणि समाजोपयोगी अशी संकल्पना असणारे उपकरण तसेच तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम कमांक मिळवुन जिल्हासाठी निवड, या सर्व बार्बीचा विचार करून तिची सदर आवार्ड साठी निवड करण्यात आली. सदर अवार्ड मिळण्यासाठी प्राचार्य लक्ष्मण लजापती, उपशिक्षक उमर पिंजारी , रितीक जैन व वृप्ती शहा यांचे मार्गदर्शन लाभले. संजय जोशी यांनी सहकार्य केले.
सदर इन्स्पायर अवार्डसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सह सचिव योगेश मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, अडमिनीस्ट्रेटर दिपीका मुंदडा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य लक्ष्मण, प्राचार्या विद्या, प्रि-प्रायमरी कोऑडीनेटर योजना ठक्कर शिक्षक-शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉफोडील सोनवणेचे अभिनंदन केले व तीला भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.





