
अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथील ३० वर्षीय तरुण भीमाशंकर येथे जातो असे सांगून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

तालुक्यातील जैतपिर येथील रवींद्र शहादू भील (वय ३०) हा दिनांक ३० जानेवारी रोजी घरून भीमाशंकर येथे यात्रेला जावून येतो असे सांगून घरून निघाला. तो पोहचला की नाही असे विचारण्यास घरच्यांनी फोन केला असता मोबाईल बंद होता. तसेच तो आजपावेतो घरी परतला नाही व मोबाईल ही बंद असल्याने त्याचा भाऊ भरत भील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.





