
अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी दिले आदेश…
अमळनेर:- अग्निशमन दलाच्या कार्यालयात मद्यसेवन केल्याने दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

परेश रवींद्र उदेवाल याने अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांचा कार्यालयात मद्य प्राशन केल्याचा व्हिडीओ बनवून तक्रार केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवला होता. मात्र समाधानकारक उत्तर देता न आल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी खैरनार यांना निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत.




