
तालुक्यातील गोवर्धन येथे शंभरावर रुग्णांची झाली तपासणी…
अमळनेर:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील गोवर्धन येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न झाले.

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गोवर्धन येथील काळभैरव मंदिरावर हे आरोग्य शिबिर पार पडले. गोवर्धन येथील सरपंच पंकज निकम व गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची मोफत इसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी शंभरावर रुग्णांची तपासणी करण्यात येवून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे डॉ. हर्ष पटेल, डॉ. आकांशा, डॉ. शुभम फावले, जनसंपर्क अधिकारी विजय राजपूत यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिरासाठी रामकृष्ण पाटील, सुशील पाटील, तेजस पाटील, अमोल पाटील, हर्षल पाटील, उमंग पाटील, राज पाटील, लकी पाटील, मयूर पाटील, हेमंत पाटील, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.




