
अमळनेर:- येथील चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पोलीस पाटील राजेंद्र माणिक पाटील गावाचे तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करू पुष्पहार अर्पण केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी, अरुण पाटील, ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील रोजगार सेवक संतोष पाटील, पुरुषोत्तम चौधरी, जयवंत पाटील, साहेबराव पाटील, गोकुळ पाटील, निंबा चौधरी,राजेंद्र पाटील यांच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार लोकनियुक्त सरपंच वर्षा पाटील यांनी मानले.




