अमळनेर:- येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मावळ्यांच्या वेशभूषा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा घेऊन शाळेत हजेरी लावली होती. यावेळी शाळेतून एक रॅली परिसरातून काढण्यात आली या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून विद्यार्थी पुढे चालत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. शाळेतील कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेच्या सचिव अलका पवार यांनी विद्यार्थ्यांना छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींचा कार्यकाळ सांगितला. शाळेच्या प्रिन्सिपल वर्षा सोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदृष्टी असलेले राजे होते. आज प्रत्येकाने त्यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यावर मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीषा सोनार व स्वाती चव्हाण यांनी केले. योगिता फाळके, सुवर्णा पाटील, मनीषा शिरसाठ, संगीता पाटील, पल्लवी येवले, भारती गव्हाणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.