अमळनेर पत्रकार संघ,न्यू प्लॉट विकास मंच व जैन सोशल ग्रुपचा उपक्रम…
अमळनेर:- अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, तसेच जैन सोशल गृप, अमळनेरच्या वतीने मोफत हृदयरोग चिकित्सा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
सदर शिबिरात धुळे येथील सुप्रसिध्द डॉक्टर्स डॉ. हर्षद डी. सुराणा एम.डी. (मेडिसिन), डी. एन.बी. (कार्डिओलॉजी) तथा कन्सल्टींग इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीस्ट हृदयरोग तज्ञ विनींग हार्ट केअर सेंटर, धुळे हे रुग्णांची तपासणी करणार आहे. या शिबिरात संपूर्ण मोफत सल्ला, मार्गदर्शन व उपचार, डायबेटीस (मधुमेह), हृदयरोग, रक्तदाब (बी.पी.), तपासणी व गरजू व निकडीच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे, छातीत धडधड करणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे,शरीरावर व पायावर सुज असणे,रक्तातील चरबीचे प्रमाण वाढणे, ई.सी.जी. मध्ये बदल होणे, शरीरातील रक्त कमी होणे, दीर्घ काळाचा ताप असणे, भरपुर घाम येणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी सदर शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा.सदर शिबिर रविवार, दि.२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सेवा मेडिकल समोर, अमळनेर येथे होणार आहे.
रुग्णांनी आपली नावे रॉयल मेडिकल, (झामी चौक) धनश्री मेडिकल, (धुळे रोड) देवांश मेडिकल, (पैलाड), धिरज ऍग्रो (भाजी बाजार), अरिहंत मेडिकल, (धुळे रोड) सेवा मेडिकल,(पोस्ट ऑफिस जवळ) विजय मेडिकल, (भाजी बाजार) पारख मेडिकल, (न्यु प्लॉट) येथे नोंदवावीत असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे प्रेसिडेंट देवांग शाह,सेक्रेटरी सौरभ जैन,प्रोजेक्ट चेअरमन उमेश पारख व निखील पारख तसेच सर्व सदस्य जैन सोशल गृप, अमळनेर यांनी केले आहे.