जैतपिर शिवारातील घटना, मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर शिवारात चार हजार मीटर विजेची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मारवड कक्षाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैतपिर शिवारात दोन डीपीवरील अनुक्रमे २२०० मीटर व १८०० मीटर लांबीची अल्युमिनियमची विजेची तार इलेक्ट्रिक पोलवरून कट करून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे घटना उघडकीस आली. त्यामुळे मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.