
आमच्या आमदारांवर कोणताही डाग नाही – राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांचा पलटवार…
अमळनेर:-तुमच्याकडे आमदार अनिल पाटील यांच्या विषयी व्हिडीओ क्लिप असल्याचे सांगून ब्लॅकमेलिंग करण्याचे धंदे तुम्ही नंदुरबारलाच दाखवा,तुमच्यावर आहे पण तुमच्या नगराध्यक्षांवर डाग नसल्याचे तुम्ही सांगतात तसाच आमच्या आमदारांवरही कोणताही डाग नसुन ते स्वच्छ प्रतिमेचे विकासाभिमुख नेते असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील व शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांनी माजी आमदारांना उद्देशून केला आहे.

माजी आमदारांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक काढत विविध आरोपाबाबत खुलासा केला आहे.यात त्यांनी म्हटले आहे की माजी आमदारांनी ती स्वकल्पित व्हिडिओ क्लिप तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचे सांगितले मग अजित दादानी बडतर्फीची किंवा कोणतीच कारवाई केली कशी नाही?आणि मंत्रीपद कसे दिले याचा खुलासा माजी आमदारांनी करावा.तसेच तशी व्हिडीओ क्लिप तुमच्याकडे असतीच तर अजितदादांकडे देण्याइतके दुधखुळे तुम्ही मुळीच नसून तुम्ही ती जनतेसमोरच आणली असती हे न समजायला जनताही दुधखुळी नाही.तुमच्या नंदुरबार येथील मारहाणीच्या पराक्रमाच्या व्हिडीओबद्दल तुम्हाला एवढा राग असेल तर ते व्हिडीओ आम्ही केलेले नसून नंदुरबारकरानीच ते केले असल्याने त्याचा राग तेथील लोकांवरच काढा, अमळनेर येथेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राने ते उघड्या डोळ्यांनी ते पहिले याचे भान असुद्या.जे घडले तेच व्हिडीओमध्ये असताना त्याचा तुम्हाला एवढा राग का?.
तसेच डीपी रस्त्यांचे काम उत्कृष्ठ असताना तुम्हाला कामाच्या दर्जाबाबत शंका असल्याचं विशेष यंत्रणा बोलावून तपासणी करा आणि त्यासोबत तुमच्या काळात झालेल्या रस्त्यांची देखील तपासणी जरूर करून घ्या.आणि आमदार कोणत्या रस्त्याच्या कामात पार्टनर आहेत हे देखील सिद्ध करून दाखवुन जनतेसमोर आणा.याउलट तुमच्या काळात कशी व कुणाकुणाला कामे दिली गेलीत याची संपूर्ण यादी आमच्याकडे देखील असल्याचे यात म्हटले आहे.
पीक विम्याचे पैसे खाल्ल्याचा बालिश आरोप तुम्ही करतात.पण ते पैसे आमदारांना कसे मिळतात किंवा खात्यात कसे येतात ते एक माजी आमदार म्हणून तुम्हाला जरा ज्ञान असुद्या.मदत व पुनर्वसन विभागाकडून डीबीटी यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात 692 कोटी जमा झाले असताना काहीतरी तथ्यहीन आरोप करायचे म्हणून करायचे हे माजी आमदार म्हणून तुम्हाला शोभत नाही.तसेच तुम्ही एक माजी आमदार असताना एका सन्माननीय विद्यमान आमदारांबद्दल तू ता शब्द वापरून असुस्कृतपणा दाखवितात हे तुम्हाला शोभत नसून अमळनेर ची अशी संस्कृती मुळीच नाही.तसेच तुम्ही आमच्या भूमिपुत्र आमदारांना गाव सोडावे लागेल असे वक्तव्य करतात पण लक्षात घ्या ते येथील भूमीपूत्र असून तुंम्हीच उलट उपरे आहेत त्यामुळे आमचे गाव पुढे तुम्हालाच सोडावे लागेल.यापुढे कोणत्याही धमक्या देऊ नका,पालिकेत थोडीफार सत्ता मिळाली आहे त्याचा काही दिवस आनंद घ्या.अमळनेर शहर व मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमचे आमदार सक्षम आहेत असा दावा या पत्रात भागवत पाटील व मुक्तार खाटीक यांनी केला आहे.




