गावासाठी एलआयसीतर्फे ७५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान…
अमळनेर:- भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेतर्फे कळमसरे गाव विमा ग्राम म्हणून घोषित करण्यात आले असून याबाबत शाखाधिकारी गोपाल सोलंकी उपशाखाधिकारी सुमितकुमार, विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत यांना एलआयसीतर्फे ७५ हजार रुपयाचा धनादेश गावाचा विकास कामासाठी देण्यात आला.
विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी या आर्थिक वर्षात गावातील ग्रामस्थांच्या मोठ्या प्रमाणात विमा कवच देऊन सुरक्षित केले. त्याबद्दल बक्षिस म्हणून येथील ग्रामपंचायतीला पंच्यात्तर हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सोलंकी म्हणाले की, एलआयसी ही सामाजिक बांधिलकी जोपासते. म्हणूनच अमळनेर येथील मतिमंद व मूकबधीर विद्यालयाला मुलांना ये जा करण्यासाठी सुमारे पंचवीस लाखाची गाडी भेट दिली आहे.उपशाखाधिकारी सुमित कुमार यांनी कळमसरे ग्राम विमा ग्राम घोषित करण्यामागे विमा अभिकर्ता बाबुलाल पाटील यांनी मेहनत घेत ग्रामस्थांना सुरक्षित विमा कवच देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
याप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चिंधा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, पाडळसरे येथील रविंद्र पांडुरंग पाटील, सचिन योगराज पाटील,अशोक तुळशीराम चौधरी, अरुण पांडुरंग चौधरी, झूलाल भबुता चौधरी, धमेंद्र रणजितसिंग राजपूत, नगराज चौधरी, रामलाल पाटील, सीताराम चौधरी, सुनील पाटील, योगेंद्र चौधरी, योगेश पाटील, नारायण पाटील, शरद चौधरी, प्रदीप पाटील, किशोर चौधरी, पोलीस पाटील गोपाल पाटील, स्वप्नील माळी, गजानन पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.