अमळनेर:- येथील पांचाळ सुतार सहाय्यक मंडळ, पैलाड संस्थेच्या वतीने काल सृष्टीचे रचियता आराध्य दैवत विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री महामंडलेश्वर 1008 ईश्वरदासजी महाराज श्री क्षेत्र नंदगाव आश्रम हे उपस्थीत होते. यावेळी उमंग सृष्टी परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. लोहार, सुतार, शिल्पकार, सर्व ठेकेदार, बांधकाम कामगार, अमळनेर शहर प्लंबर युनियन, अमळनेर तालुका पत्रकार संघटना तथा उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने संपदा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भैय्या सुतार, आबा सुतार, भरत सुतार व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.