
डांगरी येथील घटना, मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील साठ वर्षीय वृद्धाने स्मशानभूमीतच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल २३ रोजी घडली आहे.

डांगरी येथील वेलचंद तोताराम भील (वय ६०) यांनी गावाच्या स्मशानभूमीत चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गावातील लोकांनी त्यांना उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले. याबाबत अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सुनील तेली हे करीत आहेत.




