
अमळनेर:- एकाच महिलेवरील प्रेमातून एकाने दुसऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून दहिवद येथील हिम्मत प्रभाकर पाटील याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील दहिवद येथील दिलीप उर्फ सुरेश भालेराव देसले (वय ४०) याने २२ रोजी साडे नऊ वाजेपुर्वी भिला माळी यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी दिलीप उर्फ सुरेश याने त्याचे मेव्हणे हेमकांत बाजीराव देवरे यांच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली होती. त्यात त्याने लिहिले होते की “हिंमत प्रभाकर पाटील यांचे जिथे लफडे होते तिथेच माझे लफडे जोडून दिले होते. नंतर त्याची दानत फिरली. ती महिला माझ्यासोबत आल्या नंतर हिंमत तिला शिवीगाळ करत असे. वारंवार तिला अश्लील भाषेत बोलत असे” त्यावरून व्यथित होऊन दिलीप उर्फ सुरेश याने २२ रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. फिर्यादी हेमकांत बेहरे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला हिम्मत प्रभाकर पाटील याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.

