
अमृत भारत योजनाअंतर्गत स्थानकाचा समावेश, 29 कोटी निधीतून होणार कायापालट…
अमळनेर:- अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत अमळनेर स्थानकाचा समावेश झाल्याने स्टेशनच्या पुनर्विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन दि 26 रोजी करण्यात आले.
सदर योजनेंतर्गत सुमारे 29 कोटी निधीतून विकास कामे होऊन स्टेशनचा संपुर्ण कायापालट होणार आहे.विशेष म्हणजे स्टेशनचे नवीन मॉडेल अत्यंत सुंदर बनविण्यात आल्याने शहराचा सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.सदर ऑनलाइन उद्घाटनाची जय्यत तयारी अमळनेर स्टेशनवर करण्यात आली होती. भारतातील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि 1500 रोड ओव्हर ब्रिज/अंडरपास याची पायाभरणी व उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठेवण्यात आले होते.अमळनेरात भूमीपूजनाच्या पूर्वी विविध शाळांच्या विद्यार्थ्यां सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले यात एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कुल, डी आर कन्या शाळा, भगिनी मंडळ शाळा,विवेकानंद स्कुल आदी शाळांचा समावेश होता तर काहीं रेल्वे कर्मचारीनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करून रंगत आणली. पंतप्रधान ऑनलाइन येण्यापूर्वी मंचावर उपस्थित असलेल्या माजी आमदार स्मिता वाघ,माजी सभापती श्याम अहिरे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भिकेश पावभा पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील यांनी मनोगत व्यक्त करून मोदी व भाजप सरकारच्या कामाचे कौतुक करून अमृत भारत मध्ये अमळनेर स्टेशनचा समावेश केल्याने केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले.
दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाइन स्क्रीनवर आल्यानंतर त्यानी मनोगत व्यक्त करून अमृत भारत योजनेतील संपूर्ण 554 स्थानकाच्या पुनर्विकास कामांचे कळ दाबून भूमीपूजन केले.त्याच वेळी अमळनेर येथे उपस्थित खासदार उन्मेष पाटील, स्मिता वाघ व मान्यवरांनी कोनशीला अनावरण केले.उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.यावेळी अमृत भारत योजनेतून निर्माण होणाऱ्या नव्या स्थानकाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती ती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह अनेकांनी गर्दी केली होती.शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी वलसाड येथील रेल्वेचे सिनियर डी ई जसविंदर पाल, अमळनेरचे सीएमआय रवी पांडे,स्टेशन मास्तर अनिल शिंदे, असिस्टंट इंजिनिअर अनिल अग्निहोत्री तसेच बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, संचालक समाधान धनगर,खा शि मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, भाजप ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव भारती सोनवणे,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ संजय शाह,चंद्रकांत कंखरे, राहुल पाटील,जेठमल जैन, प्रीतपालसिंग बग्गा,सुरेश अर्जुन पाटील,अनिल शिसोदे, नीरज अग्रवाल,भाजप शहराध्यक्ष विजय राजपुत,विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख,महिला आघाडी शहराध्यक्ष कविता जाधव, प्रा एम एस बडगुजर, कमल कोचर,प्रा रंजना देशमुख, भारती शिंदे,आशा चावरीया, राकेश पाटील,दिनेश नाईक, मीना सोनवणे, छाया पाटील, मुक्तार खाटीक,इम्रान खाटीक, एल टी पाटील,नाना निकुंभ यासह असंख्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद नायर व निकिता सोनवणे यांनी केले.




