अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भूषण संजय भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. सुनील तटकरे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, जयश्री पाटील,योगेश देसले आदींनी अभिनंदन केले आहे.