कुठलीही करवाढ नाही, नागरिकांना 24 तास पाणी देण्यासाठी 80 कोटींचा प्रस्ताव…
अमळनेर:- येत्या 2024-25 या वर्षासाठी अमळनेर नगरपरिषदेचा 360 कोटींचा शिलकी अर्थसंकल्प काल दि 29 रोजी जाहीर करण्यात आला असून यंदा कुठलीही करवाढ नसल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अर्थसंकल्पात नागरिकांना संपूर्ण सात दिवस 24 तास पाणी देण्यासाठी अमृत योजनेंतर्गत 80 कोटी खर्चाचे प्रयोजन करण्यात आले असून प्रस्ताव,रस्ते,भुयारी गटारी निर्मितीसह ताडे नाला विकासासाठी अमृत सरोवर व अमृत उद्यान अंतर्गत 5 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान दि 27 रोजी न.पा. सभागृहात सन २०२४-२५ या वर्षांची अंदाजपत्रकीय प्रशासकीय सभा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी लेखापाल चेतन गडकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले आणि सदर सभेपुढे रक्कम रु. ३६०.११,४८,०००/- मात्रचे अंदाजपत्रक सादर केले व त्यास मंजूरी प्रदान केली.
अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे…
अमळनेर नगपरिषदेचे महसुली व भांडवली जमा-खर्चाचे अंदाजपत्रक प्रारंभीक व अंतिम शिल्लकेसह अनुक्रम रक्कम रू. ८२,२४,६५,०००/- व २७७.८६.८३,०००/- असे एकुण रू. ३६०,११,४८,०००/- मात्र आहे आहेत. सदर अंदाजपत्रक रक्कम रू.३२.८३,०००/- ने शिल्लकी असून यात रोख स्वरूपात २.६९,०००/- रु व बँकेतील विविध खात्यातील शिल्लक रु. ३०,१४,०००/- मात्र दर्शविण्यात आलेली आहे आहे. सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता आर्थिक वाढीचे नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आहे.त्याकरीता प्रशासकिय खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबविण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत अंदाजित ३० कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील वाढीव भुयारी गटार योजनेसाठी प्रयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य सुर्वण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत अंदाजित ७० कोटीनिधी शहरातील डी. पी. रोड साठी मंजुर करण्यात आला आहे. लवकरच सदर कामांना सुरुवात करण्यात येईल.
या आहेत विशेष तरतुदी…
अमृत योजना २.० अंतर्गत अंदाजित ८० कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी २४ बाय ७ दिवस उपलब्ध करुन देण्यासाठी व नविन जलकुंभाचे बांधकाम तसेच शहरासाठी नविन पाईप लाईन टाकणेसाठी प्रयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत अंदाजित ४५ कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील रस्ते रुंदीकरणसह भुयारी मार्ग बांधकाम करणेसाठी प्रयोजन करण्यात आले आहे.अमृत सरोवर व अमृत उद्यान (ताडे नाला) विकसित करणे साठी अंदाजित ५ कोटीचे प्रयोजन करण्यात आले आहे.कायद्यातील तरतूद व शासन निर्देशानुसार दुर्बल घटक कल्याण निधी ९०,००,०००, अपंग कल्याण निधी १७.००,००० व महिला व बाल कल्याण विकास ५,००,००० या कल्याणकारी योजनांवर विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.न.पा. चे व्यापारी संकुलाचे लिलावाद्वारे उत्पन्नात भरीव वाढ करण्याचे प्रयोजन आहे.तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व मालमत्ताचे जी आय सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरु असुन त्यानुसार पुढील वर्षापासुन कर आकारणी केली जाणार आहे.