
अमळनेर:- तालुक्यात ३ हजार १०४ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा दिली. ११ बैठे पथक आणि एक फिरते पथक असे १२ पथक परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नेमण्यात आले होते.
१ मार्च रोजी मराठी भाषेचा पेपर होता. ३ हजार १७४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यात सात विद्यार्थी दिव्यांग होते. त्यांना लेखक आणि जादा वेळ देण्यात आला होता. ७० विद्यार्थी गैरहजर होते. उर्दू माध्यमाचे १८२ विद्यार्थी प्रविष्ट होते. १ विद्यार्थी गैरहजर होता.
परीक्षा केंद्रांवर सकाळी दहा वाजेपासूनच बैठे पथक नियुक्त करण्यात आले असल्याने परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. मुलींची तपासणी महिला शिक्षकांकडून केली जात होती. ग्रामीण भागात काही परीक्षा केंद्रांवर कंपाऊंड नसल्याने किंवा तुटलेले असल्याने पालक व लहान विद्यार्थी तसेच टारगट मुले गोंधळ घालत होते.




