
ग्रीन झोन केल्याच्या निषेधार्थ नगरपालिकेवर मोर्चा काढून केले ठिय्या आंदोलन…
अमळनेर:- शहराच्या नवीन विकास आराखड्यातून पुरातन वरणेश्वर मंदिर आणि रस्ता वगळून त्याठिकाणी ग्रीन झोन केल्याच्या निषेधार्थ भक्तांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
१९९४ साली नगरविकास आराखड्यात तीर्थक्षेत्र वर्णेश्र्वर मंदिर व रस्ता याची नोंद आहे. मात्र शहराच्या नवीन विकास आराखड्यातून हेतुपुरस्कर ते वगळण्यात आले आहे. पुरातन काळातले मंदिर वगळणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या ठिकाणी नवीन आराखड्यात ग्रीन झोन दर्शवण्यात आले आहे मात्र ज्या समाजाचे अंत्यसंस्कार होत नाही त्यांचा दफनविधी त्यांचे अंत्यसंस्कार गट नंबर ४१४ आणि गट नंबर ४१५ मध्ये होतात ,हा भाग बोरी नदीच्या पूर नियंत्रण रेषेत येतो. त्यामुळे हा भाग जमीन, रहिवास, ग्रीन झोन होऊच शकत नाही. त्यामुळे वगळलेले मंदिर पुन्हा आराखड्यात घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सकाळी वर्णेश्र्वर भक्तांनी पैलाड भागातून मोर्चा काढून नगरपालिकेच्या ओट्यावर ठिय्या मांडला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी नगरसेवक संजय पाटील, चंद्रकांत कंखरे, पंकज भोई, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, महेंद्र शाह, योगेश जाधव, मयूर पाटील, संजय शुक्ल, दीपक पाटील ,सतीश धनगर , योगेश धनगर ,विनोद विसपुते , महेश कोठावदे ,जितेंद्र पाटील , अतुल देसाई , रवी घोगले ,हर्षल ठाकुर , मुकेश वाल्हे , सुशांत पाटील , नितीन देसले ,सोपान पाटील , राकेश पाटील ,मनोज धनगर हजर होते.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मोर्चेकरी भक्तांची भेट घेऊन तातडीने मंत्रालयात पत्र लिहून पूर्वी प्रमाणे नोंद करण्यासाठी व्यवस्था करतो, असे आश्वासन दिले. त्यांनतर भक्तांनी आपला मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाकडे वळवला. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी देखील मुख्याधिकारी यांना तातडीने दखल घेण्याबाबत सूचना केल्या.

